जय जय महाराष्ट्र माझा,
गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा,
गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥
भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला
जबाब देती जिभा
सह्याद्रीचा सिंह गजर्तो
शिव शंभू राजा
दरी दरीतून नाद गुंजला
महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा,
गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥
काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती,
खेळ जीव घेणी
दारीद्र्यांच्या उन्हात शिजला
निढळाच्या घामाने भिजला
देश गौरवासाठी झिजला
दिल्लीचे ही तख्त राखितो,
महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा,
गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥
गीतकार- राजा निळकंठ बढे
गायक- शाहीर साबळे
संगीत – श्रीनिवास खळे



वाह बहुत सुन्दर 👌👌प्रदेश विशेष की कला और संस्कृति को और गहरे जानने मिलेगा